Teachers’ Day

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेम्बर हा भारतात शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेम्बर हाच आहे. बाबाजींनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचले.

संस्कारयुक्त शिक्षण हे त्यांचे ध्येय होते. म्हणुन या वर्षी शिक्षक दिन व श्रध्देय बाबाजी दाते जयंती समारोह हा दाते बी. पी. एड. कॉलेजच्या प्रांगणात साजरा झाला. सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेच्या वयोजेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

vishuddha-teachersday-kids-2016
teachersday_guests_2

 

Top