‘एन.सी.सी. द्वारा रक्तदान शिबीर संपन्न’

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटद्वारा दिनांक ११ सप्टे. २०१७ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबाजी दाते यांच्या जयंती निमित्य ४७ महा. बटालियन एन सी सी यवतमाळ  यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या स्वातंत्र वीर सभागृहामध्ये एन सी सी च्या ५०  कॅडेट द्वारा रक्तदान करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ४७ महा. बटालियन एन सी सी यवतमाळ चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस रमेश उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. विनायक दाते तसेच उपाध्यक्ष मा. सतीश फाटक, मा सौ सुषमा वि. दाते, कास्लीकर साहेब  उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. रविन्द्र निस्ताने हे होते तसेच उपप्राचार्य डॉ सौ माणिक ना. मेहरे यांची उपस्थित लाभली.

कार्यक्रमाच्या सुरवातिला एन सी सी बटालियनचे कर्नल एस रमेश यांना महाविद्यालयाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  मा विनायक दाते व कर्नल एस रमेश व इतर मान्यवरांच्या हस्ते RD व TSC कॅम्प मध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या व भारतीय सैन्य सेवेत नियुक्त झालेल्या एन सी सी कॅडेट चे युनिटच्या वतीने सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यानंतर  उद्घाटक  मा विनायक दाते, कर्नल एस रमेश  व डॉ रवींद्र निस्ताने साहेबांनी एन सी सी कॅडेट्स ना मौलिक मार्गदर्शन केले.  रक्तदान शिबिरामध्ये कर्नल एस रमेश यांनी स्वत; रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरवात केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. ताराचंद कंठाळे, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन  एन सी सी युनिटचे ए. एन. ओ. लेफ्टनंट प्रा प्रशांत बागडे यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक युनिटचे एन सी सी ऑफिसर शरद उईके, मोहम्मद इक्बाल, फेंडर, प्रा गणेश खंडेराव, प्रा विवेक देशमुख, प्रा विनोद तलांडे, डॉ स्मिता शेंडे, प्रा हरिदास धुर्वे, प्रा दत्तराय जोशी व महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅडेट  शुभम बडवाइक, देवेंद्र जुमले, प्रतिक कोयचाडे, अंकुश हावगे, चेतन कपिले,पूजा जन्गीलवार, नयना अन्मुल्वर, रविना पेंदोर, वर्षा मत्ते मुक्ता शेबे  यांनी परिश्रम घेतले.

Top