Home Science

गृहअर्थशास्त्र विभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय गृहअर्थ शास्त्र विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. ३० बाय ४० चौरस फूट अशा या विभागात एका भागामध्ये कुकिंग तर दुसऱ्या भागात वर्ग खोलीचे कार्य केले जाते. या विभागात प्रा. सौ. पुराणिक विभागप्रमुख वर्ष १९८१ पासून तर प्रा. सरिता देशमुख २०११ पासून तासिका तत्त्वावर कार्यरत आहे.

विभागातील प्रवेशित विद्यार्थिनी संख्या खालील प्रमाणे आहे.

  1. A. I – 72,    2.  A. – II 54,      3. A. III- 13

विद्यार्थिनी मधील कला गुणांचा विकास व्हावा म्हणून पाकशास्त्र, भरतकाम, शिवणकाम, इत्यादी बाबत विभागाद्वारे मार्गदर्शन केले जाते. तसेच आहारशास्त्र, स्वास्थ्य संबंध, गृह्व्यवस्थापन, गृह योजना, मानव विकास, बालविकास, ह्या संबंधीचे ज्ञान दिले जाते.

प्रयोगशाळेतील प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य जसे, गैस शेगडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, फ्रीज, कुकिंग रेंज तसेच ल्यापटोप, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, कॅमेरा असे आधुनिक साहित्य उपलब्ध आहे.

विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर पदवी म्हणून विभागाद्वारे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुष्परचना, हिमोग्लोबिन चाचणी इत्यादीचे कार्यक्रम राबविले गेलेत. बचतगट, वृद्धाश्रम, नर्सरी इत्यादी ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. विद्यार्थिनीनकडून वेगवेगळ्या संबधित विषयांवर Posters Flip Cards, Baby Kits तसेच भरतकामाचे प्रकार तयार करून घेतले जातात.

गृहअर्थशास्त्र विभागाचा निकाल उत्कृष्ट लागतो. काही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादित देखील स्थान प्राप्त केलेले आहे.

 

Top