शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात

५ सप्टेंबर २०१८ रोजी शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा :

विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांचा संयुक्त शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.  विशुद्ध संस्थेचे संस्थापक श्रीकृष्ण दत्तात्रेय उपाख्य बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेंबर. या दोन्ही दिनविशेषांच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने दरवर्षी ९ घटक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांचा संयुक्त कार्यक्रम घेतला जातो.
यंदाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा बाबाजी दाते महिला बॅकेच्या  अध्यक्ष सौ. विद्याताई केळकर होत्या. त्यांनी आपल्या भाषणात बाबाजींच्या जीवनात तत्त्वाला किती महत्त्व होतं ते सांगताना संपूर्ण वंदे मातरम्, पसायदान, शिस्त इत्यादी बाबतीतील आग्रह प्रतिपादन केला.
मुख्य अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्वर्ण व्यवसायी श्री. सुरेश कैपिल्यवार होते. बाबाजींच्या काॅलेजमध्ये शिक्षण घेतले असल्याने आपल्या व्यावसायिक जीवनालाही उत्तम वळण लागल्याचे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले. संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिह्न देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक यांनी प्रास्ताविकात बाबाजींचा शिक्षणाचा वारसा चालविताना संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

संस्थेच्या वतीने शिक्षक दिना निमित्त बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या  प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक, उप प्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे, पर्यवेक्षक डाॅ. सौ. स्वाती जोशी, दाते शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. मार्कस लाकडे, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. कैलास बोके, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू, विवेकानंद विद्यालयाचे श्री. देविदास भगत, व्यंकटेश विद्यालयाचे श्री. मारोती जाधव, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बळवंत सहस्रबुद्धे व रामगोपाल बाजोरिया इं. मि. स्कूलच्या मुख्याध्यापक सौ. संगीता मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. चंद्रकांत रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. ज्योती देशपांडे, श्री. मोहन केळापुरे, प्राचार्य डाॅ. राजेंद्र क्षीरसागर, प्राचार्य श्रीकांत पर्बत, श्री. मुकुंद बावणे, श्री. पुरुषोत्तम बोबडे, सौ. अस्मिता पळसोकर यांनी स्वागत केले. विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी शारदा स्तवन तर रालविच्या मुलींनी स्वागत गीत म्हटले. प्रा. डाॅ. सौ. माणिक मेहरे यांच्या वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Teachers’ Day celebrated at Babaji Datey English Medium Junior Commerce College, Yavatmal on 5-9-2018.

In the morning, students took lectures in the class. Each student delivered lecture for 15 minutes each. The classes were taken during 8.30 AM to 11.00 AM. The class rooms were decorated by students with balloons and colour decorative papers.
At 11.30 AM, a get together was arranged. Shri Satish Phatak, Vice Chairman, Vanijya Mahavidyala Trust presided over the function. Mrs Prerana Puranik was the Chief Guest and Mrs Manik Mehere was Guest of honour.
At 11.30 Am, prizes were distributed to students who performed well in the programme. The first prize was awardd to Ms Vaishnavi Jayaswal {11th English medium}. Second prize went to. Mr. Ashutosh Rathi{12th English medium} and third prize to Ms. Komal Raut{12th English medium}
Entire programme was planned and organised by students themselves. Guidance was provided by all lecturers.

Top