Admissions

प्रवेशासंबंधी सूचना

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेशासंबंधीच्या खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.

 • इ.११ वी ते पदव्युत्तर अशा सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता dateycollege.in किंवा epravesh.com/dateycollege/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने प्रवेश-पूर्व अर्ज भरावा.
 • मोबाईलवर देखील महाविद्यालयाचे वरील संकेतस्थळावर जाऊन प्रवेश-पूर्व अर्ज भरता येईल.
 • निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी २ वा. पासून संकेतस्थळावर प्रवेश-पूर्व अर्ज उपलब्ध होईल.
 • वाणिज्य आणि कला शाखेच्या प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया इ. १२वी चा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी २.०० पासून सुरु होईल.
 • कनिष्ठ महाविद्यालय (इ.११वी) कला आणि वाणिज्य शाखा तसेच एच.एस.सी. व्होकेशनल याकरिता प्रवेश प्रक्रिया इ.१०वी चा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी २.०० पासून सुरू होईल.
 • कनिष्ठ महाविद्यालय (इ.१२वी) कला आणि वाणिज्य शाखा तसेच एच.एस.सी. व्होकेशनल याकरिता प्रवेश प्रक्रिया इ.११वी चा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी २.०० पासून सुरू होईल.
 • पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी दुपारी २.०० पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु होतील.
 • ऑनलाईन प्रवेशपूर्व अर्जाचे शुल्क (महाविद्यालयाच्या माहितीपत्रकासह) रु.७०/- आहे. पण हे शुल्क डिजिटल पद्धतीने (कार्ड पेमेंट/पेटीएम पेमेंट) भरल्यास ते रु. ६०/- असेल. डिजिटल पद्धतीने शुल्क भरणे शक्य नसल्यास कार्यालयात रु. ७०/- रोख भरावे व पावती घ्यावी.
 • प्रवेश-पूर्व अर्ज भरताना त्यासोबत इतर कोणतीही शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
 • ऑनलाईन प्रवेश-पूर्व अर्जाचे शुल्क न भरल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • विद्यार्थ्याने प्रवेश-पूर्व ऑनलाईन अर्ज भरला म्हणजे त्याचा प्रवेश निश्चित झाला असे नाही. गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्याचे/विद्यार्थिनीचे नाव आल्यावर त्याने/तिने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महाविद्यालयाचे निर्धारित शुल्क भरल्यानंतरच त्याचा/तिचा प्रवेश निश्चित समजला जाईल.
 • विद्यार्थ्यांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. आणि ही यादी महाविद्यालयात नोटीस बोर्डवर लावली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये नाव जाहीर झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींनी यादी जाहीर झाल्यावर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून प्रवेश घ्यावा.
 • गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा अन्यथा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय प्रवेश आपोआप रद्द होईल.
 • SC/ST/SBC/VJNT/OBC/EBC च्या शिष्यवृत्ती अथवा सवलतीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळीच त्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या.
 • शुल्क भरून प्रवेश निश्चित केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव ते शुल्क परत मिळणार नाही.
 • विद्यापीठ परीक्षेचे शुल्क विद्यापीठाच्या नियमानुसार नंतर देय राहील.
 • विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सर्वसाधारण नियमांचे पालन करावे लागेल.
 • अपवादात्मक आणि विशेष परिस्थितींमध्ये महाविद्यालय प्रवेश नाकारण्याचा आपला अधिकार राखून ठेवते.
 • विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधीचे संपूर्ण अधिकार प्राचार्य व प्रवेश समितीला राहतील.

ऑनलाईन प्रवेश-पूर्व अर्ज भरतेवेळी खालील माहिती देणे आवश्यक आहे-

 • विद्यार्थी/विद्यार्थिनीचा आधारकार्ड क्रमांक
 • विद्यार्थी/विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक
 • Student ID No. (SSC/HSC च्या शाळा सोडल्याचे दाखल्यावर असलेला)
 • पिनकोडसहित पूर्ण पत्ता
 • संबंधित प्रवेशाकरिता पात्र परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तपशील (No. of attempts to pass last examination)
 • पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोची JPG फॉरमॅटमधील इमेज अर्जासोबत अपलोड करावी.

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश-पूर्व अर्ज दाखल करता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय मदत करेल.

प्रवेशअर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः

 • ऑनलाईन प्रवेश-पूर्व अर्जाची प्रिंट केलेली प्रत
 • इ. १०वी चे (कनिष्ठ महाविद्यालयातील किंवा एचएससी व्होकेशनलच्या प्रवेशाकरिता) आणि इ. १२वी चे उत्तीर्णता प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेची मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत. कागदपत्रांची सत्यता पडताळणी झाल्यानंतर मूळ गुणपत्रिका परत करण्यात येईल.
 • शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (ट्रान्सफर सर्टिफिकेट) मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत. प्रवेश निश्चित झाल्यास सदर दाखल्याची मूळ प्रत परत मिळणार नाही.
 • SC/ST/SBC/VJNT/OBC/EBC च्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेटची मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत सादर करावी. सत्यता पडताळणीनंतर मूळ प्रत परत केली जाईल.
 • पात्रता परीक्षा खाजगीरीत्या उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याने जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला व बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित मूळ प्रत जोडावी.
 • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाव्यतिरिक्त अन्य विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे वेळी प्रवजन प्रमाणपत्र (Migration Certificate) सादर करणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा अलीकडील रंगीत फोटो – २ प्रती
 • प्रवेश अर्जासोबत सर्व प्रमाणपत्रे असावीत. काही त्रुटी असल्यास प्रवेश तात्पुरता समजला जाईल.
Top