सुरक्षित जीवन व कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीस व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे ३१ जुलै २०१८ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता मुलांचे सुरक्षित जीवन व कायदे या विषयावर जनजागृती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष एम.आर.ए. शेख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश बस्तर हे होते. तर श्रीमती विजया पंधरे सहायक पोलीस निरीक्षक, श्री देवेंद्र राजूरकर व प्रशांत पुणेकर प्रकल्प अधिकारी आर.सी.जे.जे. हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. श्री. शेख यांनी प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच विधी सेवा पुरविण्यास प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी सध्या समाजात घडत असलेल्या घटना व मुलीनी कशाप्रकारे सावध राहणे गरजेचे आहे याची माहिती  दिली. बालक कोणकोणत्या गुन्ह्यात येत आहे ते कायदे व संबधित कलम काय आहे याची माहिती दिली. श्री. प्रशांत पुणेकर यांनी बाल अधिकार व बाल न्याय अधिनियम याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री देवेंद्र राजूरकर यांनी मुले कोणत्या कारणाने गुन्ह्यात येतात व योग्य वर्तन ठेवल्यास मुले कशी  गुन्ह्यात येणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. माणिक मेहरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचायाचे सहकार्य लाभले.

Top