राष्ट्रीय सेवा योजनेचा कौतुकास्पद उपक्रम

कु.गायत्री देवराव माने - महाविद्यालयातील बी.ए. भाग २ ची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. गायत्री देवराव माने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन -२०१८ करीता निवड झालेली आहे.  महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन.

विषबाधित शेतकऱ्यांची विचारपुस - यवतमाळ जिल्ह्यात कीटक नाशक फवारणीत अनेक शेतकरी विषबाधित झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालु आहेत. दाते कॉलेजच्या रासेयो विभागाने प्रा. डॉ. कल्पना देशमुख व प्रा. अमोल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयात जाऊन विष बाधित रुग्णांची विचारपुस केली व त्यांना चादरी व फळे यांचे वाटप केले. संस्थेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल  विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

वाचन प्रेरणादिन साजरा - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून रासेयोतर्फे साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. काही विद्यार्थ्यानी त्यांचे विचार व्यक्त केले. आयुष्यातील एकटेपणा दूर करायचा असेल तर वाचन हा एक चांगला छंद आहे असे मत प्रमुख अतिथी सुषमा दाते यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते श्री. विवेक कवठेकर यांनी आयुष्यात प्रेरणा मिळवण्यासाठी वाचनाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की ज्ञान मिळविण्यासाठी अनेक साधने आहेत त्यात वाचन हे महत्वाचे साधन आहे. प्रा. अमोल राऊत यांनी आभार मानले.

स्वच्छता उपक्रम - दाते महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानावरील गाजर गवत कापणे, प्लास्टिक केरकचरा याची विल्हेवाट लावणे, रोपट्यांना पाणी घालणे इत्यादी कामे मोठ्या उत्साहात पार पाडली. प्राचार्य डॉ. निस्ताने यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राऊत सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.

Top